X Close
X
9819022904

‘वायू’ वादळाने वाट बदलली, गुजरातवरील धोका टळला


vayu-cyclone

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे ‘वायू’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. मात्र या चक्रीवादळाची दिशा बदलल्याने गुजरातवरील धोका टळला असला तरी परिणाम मात्र जाणवणार आहे.

या वादळाने गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. या वादळाचा परिणाम समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरांना बसणार आहे. १३ जूनला वायू चक्रीवादळाचा परिणाम गुजरात किनारपट्टीला बसणार असल्याने गुजरात प्रशासनाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत.

आत्तापर्यंत ३ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. बुधवारी मुंबई-उपनगर परिसरात सकाळपासूनच जोरदार वारयांसह पावसाचा शिडकाव होत होता. गुरूवारीही शहर परिसरात ढगाळ वातावरण जाणवून येत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्राचा धोका टळला आहे तरीही लोकांनी सावधानतेचा इशारा भारतीय हवामान विभाग आणि आत्पतकालिन यंत्रणेकडून देण्यात आला आहे.

‘वायू’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुढील २ दिवस समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारी जाण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे.

(PRAHAAR)