X Close
X
9819022904

‘रात्रीस खेळ चाले’मधील ‘हा’ कलाकार करणार कॉमेडी!


pandu

मुंबई : ‘इसारलंय’, ‘त्या मला काय माहित?’, हे डायलॉग सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे डायलॉग्स लोकप्रिय झाले आहेत त्या ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकर आता कॉमेडी करणार आहे. थक्क झालात ना? पण हे खरं आहे.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ह्यचला हवा येऊ द्याह्ण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं ‘शेलिब्रिटी पॅटर्न’ हे नवीन पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वात प्रेक्षकांचे लाडके कलाकार कॉमेडी करून त्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत. या पर्वात आता पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकरची एंट्री होणार आहे. पांडू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मनोरंजित करतेच आहे.

प्रल्हाद ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर कॉमेडी करून प्रेक्षकांना किती मनोरंजित करेल हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल. प्रल्हादच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांना ‘चला हवा येऊ द्या’च्या आगामी भागात पाहायला मिळेल.

(PRAHAAR)