X Close
X
9819022904

‘मुंबई महापौर चषक योगासने स्पर्धे’त महात्मा गांधी क्रीडा अकादमीचे यश


Untitled-1-3

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका पुरुस्कृत तेराव्या ‘मुंबई महापौर चषक योगासने स्पर्धे’त वांद्रे येथील शिर्शेकर्स महात्मा गांधी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी विविध गटात यश संपदान केले असून अकादमीच्या खेळाडूंनी विविध वयोगटात वर्चस्व राखले.

एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात पार्थ पंत; तर मुलींच्या गटात दुर्वा परबने प्रथम क्रमांक पटकविला. याच वयोगटात मुलींमध्ये हिरण्या शिखरामेने तृतीय क्रमांक मिळविला. चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात अदिती सावंतने तृतीय क्रमांक पटकविला. फयाज हुसेन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली अकदामीने हे यश संपदान केले आहे.

(PRAHAAR)