X Close
X
9819022904

‘अजित पवार कुठे कुठे नाचतात हे सांगायला लावू नका’


Mumbai:

सोलापूर : यंदा प्रचाराच्या रणधुमाळीत ‘पैलवान’ हा शब्द गाजला. त्यापाठोपाठ आता ‘नाच्या’ या शब्दाची भर पडली आहे. गुरुवारी मंगळवेढय़ाच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांना ‘नाच्या’ म्हणून संबोधले होते. त्यावर तुम्ही कुठे कुठे नाचता हे मला सांगायला लावू नका, असे प्रत्युत्तर ढोबळे यांनी दिले.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचार रॅलीत लक्ष्मणराव ढोबळे झेंडा घेऊन नाचले होते. तो व्हीडिओ व्हायरलही झाला होता. यानंतर मंगळवेढय़ात लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर रॅलीत नाचण्याची वेळ आणल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ढोबळे यांना ‘नाच्या’ असे संबोधून आपले वय काय, आपण करतोय काय, याचे काहीच भान ढोबळे यांना नसल्याची टीकाही अजित पवार यांनी केली होती.

या टीकेला लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादा मी माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो आहे. तुम्ही कुठे कुठे नाचता हे मला सांगायला लावू नका, असे त्यांनी म्हटले. तसेच अजित पवार यांच्या अशा वागण्यामुळे शरद पवार अनेकदा अडचणीत येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.