मुंबई : आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या सोशल मिडियापैकी एक म्हणजे फेसबूक. मात्र डेटा लीक झाल्यानंतर फेसबूकच्या विश्वासार्हतेवर जगभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ४० टक्के लोकांचा फेसबुकववरील विश्वास उडाला असल्याचे एका सर्वेतून स्पष्ट झाले आहे.
हँकर्सनी 3 कोटी युजर्सच्या डेटा चोरला असल्याचा खुलासा फेसबुककडून करण्यात आला. मात्र त्यावर लोकांचा विश्वास बसलेला नाही. फेसबूकचे दर महिना २.३ अब्ज युजर्स आहेत. त्यात लक्षणीय घट होत आहे.
डिसेंबर महिन्यात तोलना कंपनीने १००० लोकांना सोशल मिडिया नेटवर्किंग कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये ४० टक्के लोकांनी फेसबूकच्या डेटा सुरक्षेवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. याबाबतचे वृत PCMag.com ने दिले आहे.
फेसबूकनंतर दुसरा क्रमांक लागतो तो ट्विटर आणि अँमेझाँनचा. ८ टक्के लोकांना या दोन्ही कंपन्यांवर विश्वास वाटत नाही. तर तिस-या क्रमांकवर उबेर आणि चौथ्या क्रमांकावर गुगल आहे. ७ टक्के लोकांना उबेरवर विश्वास वाटत नाही. तर ६ टक्के लोकांना डेटा सुरक्षेच्याबाबतीत गुगलवर विश्वास वाटत नाही. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि अँपल कंपनीवर लोकांना विश्वास वाटत नाही. 4 टक्के लोकांनी म्हटले आहे की, आम्हाला अँपल कंपनीवर विश्वास नाही. २ टक्के लोकांना मायक्रोसॉफ्ट कंपनीवर विश्वास वाटत नाही. जगभरातील लोकांनी सर्वात जास्त Netflix आणि Tesla या दोन कंपन्यावर विश्वास दाखवला आहे. तसेच केवळ १ टक्के लोकांनी या दोन्ही कंपन्यावर विश्वास नाही, असे म्हटले आहे.
(PRAHAAR)