X Close
X
9819022904

हरभजन सिंगचा गौतम गंभीरला पाठिंबा


gautam-gambhir-aatishi
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील लोकसभा उमेदवार अतिशी यांच्याविरोधात काढलेल्या कथित बदनामीकारक पत्रक प्रकरणात क्रिकेटपटू ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने गौतम गंभीरची बाजू घेतली आहे. गौतम गंभीर कोणत्याही महिलेबद्दल अवमानकारक वक्तव्य करुच शकत नाही, असा दावा भज्जीने ट्विटरवर केला आहे. लोकसभेची निवडणूकीतील हार जीत हा वेगळा भाग आहे, पण गंभीर सगळ्यापलीकडे आहे, असे हरभजनने म्हटले आहे. गौतम गंभीरला भाजपने पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली असून, त्याचा सामना आम आदमी पक्षाच्या अतिशीशी होणार आहे. ‘अतिशी हे मिक्स ब्रीडचे उत्तम उदाहरण आहे’ अशी टीका करणारे पत्रक गौतम गंभीरने काढल्याचा आरोप अतिशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. गौतम गंभीरने त्याचे खंडन केले असून, आम आदमी पक्षावर मानहानीचा दावा करणार असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. मलाही दोन मुली आहेत. आणि मी महिलांचा आदर करतो. माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे, असे गंभीरने म्हटले आहे. कुणी इतक्या खालच्या पातळीवर कसं काय उतरु शकतो ?हा माणूस माझ्या राज्याचा मुख्यमंत्री आहे, याची मला लाज वाटते. मला याची आधी कल्पना असती तर मी आधीच दिल्ली सोडली असती, अशा शब्दात गंभीरने अरविंद केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधले होते. (PRAHAAR)