X Close
X
9819022904

सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार


susma-90io08042019115051

दिल्ली  :  माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दरम्यान, मध्यरात्री त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानीच अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 3 वाजता लोदी रोड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सर्वांच्या मदतीला धावून येणाऱ्या, तसेच उत्तम वक्त्या, अजात शत्रू  सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातले एक तेजोमय पर्व हरपले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 1977 साली वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या त्या कॅबिनेट मंत्री ठरल्या होत्या. 1977 ते 1979 दरम्यान त्यांच्या खांद्यावर सामाजिक कल्याण, रोजगार यांसारख्या 8 महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर 1979 मध्ये 27 व्या वर्षी त्या हरियाणाच्या भाजपाच्या अध्यक्षा बनल्या होत्या.

सुषमा स्वराज यांना एका राष्ट्रीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होण्याचाही मान मिळाला आहे. याव्यतिरिक्त राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षाच्या पहिल्या महिला नेत्या होण्याचाही मान त्यांना मिळाला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. गेल्या चार दशकांमध्ये त्यांना 11 निवडणुका लढवल्या होत्या. त्यातून तीन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला होता. तसेच त्या सात वेळा खासदारही राहिल्या होत्या. सुषमा स्वराज या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार ठरल्या ज्यांना आऊटस्टॅंडिंग पार्लिमेन्टेरियन सन्मानाने गौरविण्यात आले होते.

 

(PRAHAAR)