X Close
X
9819022904

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी हायकोर्टात २१ ऑगस्टला सुनावणी


sushant-528892

मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल दोन विविध याचिकांवर येत्या २१ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं शुक्रवारी निश्चित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात येत्या १८ ऑगस्टला सुनावणी होणार असल्यानं आपण इथं सुनावणी घेण्याची घाई करायला नको, असं हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची केंद्र सरकारच्यावतीनं हायकोर्टात माहिती देण्यात आली. तसेच सुशांत सिंह प्रकरणी मुंबईत तपास करायला बाहेरच्या राज्यातून आलेल्या पोलीस अधिका-याला स्थानिक प्रशासनानं जबरदस्तीनं क्वॉरंटाईन केल्याची तक्रार केंद्र सरकारकच्यावतीनं अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आली.

तसेच मुंबई पोलीस याप्रकरणी इतर तपास यंत्रणांच्या मार्गात अडथळे निर्माण करत असल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र तूर्तास हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना यासंदर्भात कोणतंही भाष्य करणं योग्य नाही, असं म्हणत हायकोर्टानं सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

(PRAHAAR)