X Close
X
9819022904

सुदानमधील आदिवासींच्या संघर्षात २०० जणांचा मृत्यू


Bihar death-17816ID

खारटऊम (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये गेल्या काही दिवसांपासून आदिवासींमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षामध्ये आतापर्यंत २०० लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. यामध्ये महिलांसह बालकांचाही समावेश आहे.

सुदानमध्ये काही दिवसांपूर्वी आदिवासींच्या दोन गटांमध्ये वाद झाला. याचे रुपांतर संघर्षामध्ये झाले. २० ऑक्टोबर रोजी या संघर्षाला सुरुवात झाली. दक्षिण सुदान येथील ब्लू नाईल प्रांतात दोन आदिवासी गटांमध्ये वाद सुरू झाला. या संघर्षात गेल्या आठवड्यात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रयत्न करूनही दोन्ही गट कोणत्याही किंमतीत हा संघर्ष संपवायला तयार नाहीत. ही लढाई अशीच सुरू राहिल्यास आणखी अनेकांना जीव गमवावा लागू शकतो, असे मानले जात आहे.

सुदानच्या ब्लू नाईल प्रांतात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या मते, ऑक्टोबरच्या सुरुवातीला अशाच हिंसाचारात १५० लोक मारले गेले होते, तर गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या संघर्षात ५० हून अधिक लोक आधीच मरण पावले आहेत. हा हिंसाचार थांबवण्यासाठी लष्कर आणि प्रशासनाचे लोक शर्थीचे प्रयत्न करत असले तरी हिंसाचार थांबलेला नाही. या जातीय हिंसाचारात लहान मुले आणि महिलांना सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. अहवालानुसार, हिंसाचारग्रस्त भागातून किमान २००० लोकांनी स्थलांतर केले आहे. संघर्ष कमी करण्यासाठी या भागात लष्कर तैनात करण्यात आले आहे.

(PRAHAAR)