X Close
X
9819022904

सीआयएससीई टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला


Table_tennis

मुंबई (वार्ताहर) : पश्चिम बंगाल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बोर्ड अंतर्गत येणाऱ्या देशातील सीआयएससीई शालेय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षीय मुले व मुली या वयोगटात आयोजित करण्यात आली होती.

नुकतीच पश्चिम बंगाल येथील बंगाल टेनिस असोसिएशन येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षीय गटात क्रिशांक जोशी, तनय कोटक, आर्यन कीर्तने, ऋषिकेश माने, धैर्य विमल यांनी सुवर्ण पदक जिंकले. महाराष्ट्र संघात १९वर्षे मुलांच्या गटात जय दीक्षित, वीर प्रसाद, अंशुल दर्डा, नील कोयट्स यांनी महाराष्ट्राला रौप्य पदक जिंकून दिले. १७ वर्षे मुलांच्या गटात लक्ष गुजराती, अर्जुन कीर्तने व रिआन मुजगुले यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. एकेरीत मुलांच्या १४ वर्षे वयोगटात क्रिशांक जोशी याने सुवर्ण, १७ व १९ वर्षे मुलांच्या गटात लक्ष गुजराती व जय दीक्षित यांनी रौप्य पदक पटकावण्याची कामगिरी केली.

मुलींच्या १७ वर्षे गटात इरा शाह, सेरेना रॉड्रीक व योगंजली सरुक यांनी सुवर्ण पदक जिंकले. मुलींच्या १४ वर्षे वयोगटात शिबानी गुप्ते, कीर्ती यांनी घाटकर, मानसी ताम्हणकर, शंभवी शिंदे, अनन्या मोहता यांनी रौप्य पदक पटकावले. १९ वर्षीय मुलींच्या एकेरीत अलिशा देवगावकर हिने कांस्य पदक जिंकले. महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य अशा एकूण ८ पदकांची कमाई केली. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून संदीप धायगुडे व मॅनेजर म्हणून योगेश पाचपांडे होते.

(PRAHAAR)