नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू फिल सिमन्स हे आगामी वनडे वल्र्डकपनंतर अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार आहेत. डिसेंबर, २०१७ मध्ये सिमन्स यांनी अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतली होती. अफगाणिस्तानला वल्र्ड कप मुख्य फेरीत प्रवेश मिळवून देण्याचे आपले लक्ष्य साध्य झाले असून, पायउतार होण्याची ही योग्य वेळ असल्याचे सिमन्स यांनी सांगितले.
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू फिल सिमॉन्स यांनी आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला.
डिसेंबर २०१७ मध्ये सिमॉन्स यांची अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. अफगाणिस्तानला २०१९च्या विश्वचषकासाठी पात्र ठरवण्याच्या हेतूने दोन वर्षापूर्वी सुरू केलेल्या संघबांधणीत यशस्वी झाल्याने मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाला (एसीबी) मी कागदपत्रे सोपवली असून, मला माझा करार वाढवण्याची इच्छा नाही. १५ जुलै रोजी माझा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी काही तरी नवे करणार आहे,असे सिमॉन्स यांनी सांगितले.