X Close
X
9819022904

सिंधुदुर्गात उद्या डॉक्टरांचे ‘काम बंद आंदोलन’ – डॉ़ राजेंद्र पाताडे


Mumbai:

प्रहार वेब टीम 

कणकवली : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर मारहाण घटनेचे पडसाद आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटले़ सिंधुदुर्ग डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र शब्दात निषेध केला़ सोमवार १७ जुन रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यावश्यक रूग्ण सेवा वगळता डॉक्टर काम बंद आंदोलन छेडणार असल्याची घोषणा फॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेंद्र पाताडे यांनी केली़ त्याचप्रमाणे सोमवारी सायंकाळी ४ वा़ सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन डॉक्टरांवरील भ्याड हल्याबाबत निवेदन सादर केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले़
कणकवली संजवनी हॉस्पिटल येथे डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गची पत्रकार परिषद झाली़ या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेंद्र पाताडे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ़ दर्शेश पेठे, डॉ़ राजेश्वर उबाळे, सचिव डॉ़ सुहास पावसकर, सल्लागार डॉ़ अनंत नागवेकर, माजी अध्यक्ष डॉ़ विद्याधर तायशेटे, आयएमए प्रेसिडंट डॉ़ संजय केसरे, स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेच्या सेक्रेटरी डॉ़ शमिता बिरमोळे, कणकवली उपाध्यक्ष डॉ़ गीता मोघे, इंडियन डेन्टल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ़ अभिजित आपटे, डॉ़ निलेश पाकळे, डॉ़ समीर नवरे, डॉ़ प्रशांत मोघे, डॉ़ मयुर नागवेकर, डॉ़ धनेश म्हसकर, डॉ़ अमोघ चुबे, डॉ़ विजय तावडे, डॉ़ मिनल आपटे, डॉ़ स्वप्नील राणे, डॉ़ सतीश पवार, डॉ़ प्रशांत मोघे, डॉ़ प्रशांत पारकर, डॉ़ निलेश पेंडूरकर, डॉ़ निलेश कोदे, डॉ़ मिलींद तेली, डॉ़ संदीप सावंत, डॉ़ मिलींद काळे आदींसह डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते़
डॉक्टर हा माणूस आहे याची जाणीव समाजाने ठेवावी आणि तशी वागणुक त्याला दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना डॉ़ राजेंद्र पाताडे म्हणाले, सोमवारी होणाºया काम बंद आंदोलनात अ‍ॅलिओपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी, डेंटल्स अशा सर्व डॉक्टरांचा आणि डॉक्टर संघटनांचा सहभाग असेल़ हा प्रतिकात्मक बंद असून सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने या बंदसाठी सहकार्य करावे, असे आवाहन फॅटर्निटी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे़
सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती डॉक्टरांना मान-सन्मान देणारी आहे़ म्हणूनच सिंधुदुर्गात आम्ही मोठ्या आत्मविश्वासाने कोणत्याही भितीच्या छायेखाली न राहता उपचार देतो़ मात्र प्रत्येक उपचाराची आणि मानवी शरीराची मर्यादा ठरलेली असते़ वैद्यकीय ज्ञानाला, उपचारांना आणि प्रयत्नांनाही मर्यादा आहेत़ हे ओळखून समाजाने डॉक्टरांना सहकार्य केले पाहिजे़ ज्या गोष्टीला कोणताही इलाज नाही अशा घटनांमध्ये डॉक्टरांना दोषी ठरवून ज्या अपप्रवृत्ती प्राणघातक हल्ले करतात त्या थांबल्या पाहिजेत़ पश्चिम बंगाल मध्ये अशाच अपप्रवृत्तीने डॉक्टरांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा आपण निषेध नोंदवित असल्याचे डॉ़ पाताडे म्हणाले़
भारतात १७०० रूग्णांमध्ये १ डॉक्टर असे प्रमाण आहे़ ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे़ झपाट्याने वाढणाºया भारतीय लोकसंख्येला डॉक्टर दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत़ कुटुंब आणि स्वत:च्या आवडीनिवडी बाजूला ठेवून सेवा देणारा डॉक्टर हा यंत्रमाणव नाही तर माणूस आहे, अशी भावना समाजाने जोपासावी, अशी भूमिका डॉ़ पाताडे यांनी व्यक्त केली़
डॉ़ नागवेकर यांनी रूग्णांच्या नातेवाईकांचे गैरसमज निर्माण होऊ शकतात़ आणि तसे होणे नाकारता येणार नाही़ मात्र डॉक्टरांशी सल्ला मसलत करून रूग्ण दगावण्यामागणी कारणे समजून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली़ डॉ़ संजय केसरे यांनी लाकडी फळीच्या एका टोकावर डॉक्टर आणि एका टोकावर रूग्ण उभे आहेत़ आणि रूग्णाकडूनच डॉक्टरावर हल्ला झाला, त्या फळीवरून डॉक्टर खाली पडला तर दुसºया टोकावर असलेला रूग्णही खाली पडेल, असे उदाहरण देऊन चांगल्या सेवेची ज्यांच्याकडून अपेक्षा करतो त्यांना जपले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली़ डॉ़ विद्याधर तायशेटे, डॉ़ शमिता बिरमोळे, डॉ़ मयुर नागवेकर, डॉ़ अभिजित आपटे, डॉ़ दर्शेश पेठे यांनी आपले विचार मांडले़ क्लबचे सचिव डॉ़ सुहास पावसकर यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले़