साकीनाका झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण; मरकज कनेक्शन उघड
Mumbai:मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या साकीनाका परिसरात रविवारी कोरोनाचा रुग्ण सापडला. हा रुग्ण दिल्लीच्या मरकजमधून परतला होता. त्यामुळे या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. रविवारी या टेस्टचा रिझल्ट समोर आला असून यामध्ये संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती साकीनाका परिसरात राहणारे काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिली.
त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाचा धोका आणखीनच वाढला आहे. साकीनाका झोपडपट्टीचा परिसर हा अत्यंत दाटीवाटीचा आहे. कुर्ला परिसरही या भागाला लागूनच आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या संपकार्तून इतरांना संसर्ग झाला असल्यास मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती आहे.
कुर्ल्यातील जरीमरीचा परिसर यापूर्वीच पालिकेकडून सील करण्यात आला आहे.