X Close
X
9819022904

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना कोरोना


mulayam 5-11-16

लखनऊ (वृत्तसंस्था) : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना कोरोनाची बाधा झाली आहे. समाजवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. बुधवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान मुलायम सिंह यांना कोरोनाची लक्षणं दिसत नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

(PRAHAAR)