X Close
X
9819022904

समर्थ सेवासुर्य किसन महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन


pal-696x228
मुंबई : इंचगिरी सांप्रदाय सेवासुर्य किसन महाराज वारकरी सेवा मंडळाच्या वतीने समर्थ सेवासुर्य किसन महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक ह.भ.प.गुरुवर्य सुभाष महाराज घाडगे ( भाऊ ) यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीचे प्रस्थान ४ जुलै रोजी सकाळी ९ ला होणार आहे. सेवासुर्य किसन महाराज स्मृती मंदिर क्षेत्र कोळेवाडी, माण तालुका, सातारा जिल्ह्यातून पालखी प्रस्थान करणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. (PRAHAAR)