X Close
X
9819022904

श्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर बुरख्यासह चेहरा झाकणा-या प्रत्येक गोष्टींवर बंदी


face1

कोलंबो:  ईस्टर संडे साजरा होत असताना 21 एप्रिलला श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलमध्ये आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. श्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर बुरख्यासह चेहरा झाकणा-या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला असून ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे.

कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 500 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रीलंकन सरकारने ‘चेहरा झाकणा-या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तिची ओळख पटण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध केला जात आहे. राष्ट्रपतींनी त्याबाबतचा निर्णय घेतला आहे’ असे ट्वीट केले आहे. सरकारचा हा निर्णय आजपासून लागू होत आहे. फेस मास्कसह ज्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तिची ओळख पटण्यात अडचणी येतात, अशा सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणारी व्यक्ती राष्ट्रीय आणि पब्लिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात, असे आदेशात म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मैत्रीपाला यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही आपला चेहरा झाकता कामा नये, सुरक्षा यंत्रणांना ओळख पटविण्यात अडचणी होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी’ असे आवाहन केले आहे. https://twitter.com/MaithripalaS/status/1122560493497880576

बुरखा परिधान करून जाऊ नका

श्रीलंकेत सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करून जाऊ नका, असे आवाहन ऑल सिलोन जमैयतूल उलेमा या श्रीलंकेतील मुस्लिम संघटनांनी महिलांना केले आहे.

(PRAHAAR)