X Close
X
9819022904

लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊवर


Accident 11-9-17

 

मुंबई (प्रतिनिधी) : लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील प्रकृती गंभीर असलेल्या एका रुग्णाचा मसिना रुग्णालयात आज मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या नऊवर पोहचली आहे. ९ पैकी ७ मृत्यू केईएम रुग्णालयात तर २ मृत्यू मसिना रुग्णालयात झाले आहेत.

लालबाग, साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीचे लग्नकार्य होते. ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी सकाळच्या सुमारास जेवण बनवले जाणार होते. मात्र रात्रीपासून गॅस गळती झाल्याने गॅस पेटवताच सिलेंडरचा स्फोट होऊन १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी सुशीला बांगरे (६२) आणि करीम (४५) यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.
शुक्रवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता मंगेश राणे (६१), सकाळी ९.२५ वाजता ज्ञानदेव सावंत (८५) यांचा तर दुपारी १.३० वाजता महेश मुणगे (५६) यांचा अशा तीन जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता. त्यामुळे मृतांची संख्या ५ वर गेली होती. त्यानंतर १२ डिसेंबरला सायंकाळी ७.४५ वाजता विनायक शिंदे (४७) यांचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची आकडेवारी ६ वर पोहचली. १४ डिसेंबरला मध्यरात्री रोशन अंधारे व १५ डिसेंबरला मध्यरात्री सूर्यकांत अंबिके यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ वर पोहचला होता. आज २५ डिसेंबरला सायंकाळी ४.२० वाजता बिपीन (५०) यांचा मसिना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामुळे लालबाग दुर्घटनेतील मृतांचा आकडा ९ वर पोहचला आहे.

(PRAHAAR)