X Close
X
9819022904

राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी


Alchohol-7H474_1

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व मद्यालयांना (लीकर बार) सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला. त्याचवेळी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही वेळमर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांना देण्यात आले आहे.

हॉटेल, मद्यालयांना व्यवसाय करण्याची मुभा सोमवारपासून शासनाने दिली. त्यानुसार हॉटेल व्यवसाय सुरू झाला. मात्र वेळ मयार्देबाबत शासन आदेश स्पष्ट नसल्याने मद्यालय चालक मालक संभ्रमात होते. काही महापालिकांनी मद्यालयांना संध्याकाळी सात, नऊ, दहा वाजेपर्यंत व्यवसाय किंवा मद्याविक्रीची परवानगी दिली. तर काही महापालिकांनी वेळ नमूद न करता नियमांप्रमाणे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी, असे ढोबळ आदेश काढल्याने संभ्रम निर्माण झाला.

नियमांप्रमाणे व्यवसाय म्हजणे मध्यरात्री एकपर्यंत व्यवसायास परवानगी, असा समज काही मद्यालय मालकांनी करून घेतला. तर उत्पादन शुल्क, पोलीस, पालिका अधिकारी-कर्मचा-यांनी मद्यविक्री केंद्रांना (वाईनशॉप) संध्याकाळी सातपर्यंत परवानगी असल्याने मद्यालयांनीही त्याच वेळमर्यादेत मद्यविक्री करावी, असा ग्रह करून घेतला. त्यामुळे संभ्रम आणखी वाढला. परिणामी मुंबई महानगर प्रदेशातील तुरळक मद्याालये खुली झाली. त्यापैकी काही मद्यालये संध्याकाळी सातनंतर बंद करावीत यावरून शासकीय यंत्रणा आणि मद्याालय चालकांमध्ये वादही झाले.

या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेळमर्यादेबाबत एकसूत्रता आणून संभ्रम दूर केल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक शहर, जिल्ह्यांतील मद्याालये रात्री दहापर्यंत व्यवसाय करू शकतील. मात्र परिस्थितीनुसार ही वेळ मर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांकडे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हॉटेल, मद्यालयांसाठी नियमावली निश्चित करण्याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाने घेतलेला निर्णय उत्पादन शुल्क विभागाने सर्व जिल्हा अधिक्षक, भरारी पथक आणि अन्य विभागातील जबाबदार अधिका-यांना कळवल्याचे समजते.

(PRAHAAR)