X Close
X
9819022904

यमुना एक्स्प्रेस वेवर बस नाल्यात कोसळून २९ जण ठार


Accident-yamuna
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवेवर एका प्रवासी बसचा सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात २९ जण ठार झाले आहेत तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. प्रवासी बस लखनऊहून दिल्लीला जात होती. मृतांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेश रोडवेजने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. (PRAHAAR)