X Close
X
9819022904

मौदे एस.टी सेवा तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा स्वाभिमानचा इशारा


Mumbai:

प्रहार वेब टीम 

वैभववाडी : आखवणे – भोम येथील बुडीत क्षेत्रातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलमाती साचल्यामुळे मौदेकडे जाणारी एस टी सेवा बंद झाली आहे. याचा फटका प्रवाशांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमान जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी अरुणा प्रकल्प अधिकारी व कंपनीचे प्रतिनिधी यांची भेट घेतली. बुडीत क्षेत्राबाहेरून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याने तात्काळ एस.टी सेवा सुरू करा. आणि प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करा. अशी मागणी श्री साठे यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. मौदे एस.टी सेवा तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री साठे यांनी दिला आहे.

अरुणा प्रकल्प घळभरणीचे पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हेत शेवरी फाटा ते आखवणे, भोम व मौदेकडे जाणारा रस्ता बंद झाला. दरम्यान संबंधित कंपनीने पर्यायी रस्त्याची सोय केली. परंतु पावसात या रस्त्यातून प्रवास करणे खूपच धोकादायक आहे. त्याचबरोबर भोम नजिक रस्त्यात मातीचा ढीग जमा झाल्याने कणकवली आगाराने एस. टी सेवा बंद केली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान रविवारी भालचंद्र साठे, मौदे सरपंच अनंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रकल्प कार्यालय गाठले. या बैठकीत कंपनीने हेत ते भोम अशी खाजगी सेवा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. नवीन बायपास मार्गावरील उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी. मौदे, भोम गुरववाडी येथील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करा. अशी मागणी साठे यांनी केली आहे.