मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुस-यांदा शपथ घेतल्यानंतर आज सकाळी मुंबईतल्या दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्सने उच्चांक गाठला. शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०,०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीतही ७९. ३५ अंकांनी वाढ झाली असून निफ्टीने शुक्रवारी सकाळी १२,०२५.२५ चा टप्पा गाठला.
यापूर्वी २३ मे या दिवशी सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांचा आकडा गाठला होता.
(PRAHAAR)