X Close
X
9819022904

मुख्याध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार


govt

मुंबई (प्रतिनिधी) : शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा पास असणे बंधनकारक केले आहे. मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये टीईटी परीक्षा पास नसलेले अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांचे पगार थांबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते.

मात्र तरीसुद्धा अनेक शाळांमध्ये बिगर टीईटीधारक शिक्षक शाळांमध्ये शिकवतच आहेत. त्यामुळे वारंवार सांगूनही या शाळा निर्णय घेत नसल्यामुळे अशा शाळांमधील मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे.

बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी बंधनकारक आहे. जे शिक्षक टीईटी परीक्षा संदर्भातील निर्णय घेण्याआधी रुजू झाले आहेत अशा शिक्षकांनाही परीक्षा पास होण्यासाठी तीन संधी दिल्या होत्या. मात्र या तीन संधी मध्येसुद्धा जे शिक्षक पास झाले नाहीत अशा शिक्षकांची माहिती जमा करण्यात येत आहे.

ज्या शाळा टीईटी संदर्भातील अटी – नियमांचे पालन करत नाहीत आणि ज्या शिक्षकांनी टीईटी पास प्रमाणपत्र सादर केले नाही अशा शिक्षकांचे वेतन त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा संबधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभाग कार्यालयाने दिले आहेत.

(PRAHAAR)