X Close
X
9819022904

मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक आता मराठीतच


govt

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांचे नामफलक आता मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्व महाविद्यालयाचे नामफलक मराठीत करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत असावे अशीही मागणी युवासेनेने मुंबईतील शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन केली होती.

दरम्यान मंगळवारी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये सुयोग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे आदेश मुंबईतील अनुदानित ३९४, विनाअनुदानित ६७८ आणि अन्य खासगी बोर्डाच्या २१९ शाळांना दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून हा निर्णय मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांसाठी घेण्यात आला आहे. मात्र राज्य स्तरावर अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

(PRAHAAR)