X Close
X
9819022904

मुंबईत संशयित माओवाद्याला अटक


Afghan-students-arrested-in-India 1

मुंबई : मुंबईत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या संशयित माओवादीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. दलविरसिंग बलवंतसिंग रावत ( ३४) उर्फ पप्पू नेपाळी असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह देशभरात दरोडे, जबरी चोरीचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

याच दरोड्याच्या रकमेतून तो माओवादी संघटनेला मदत करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली असून त्यानुसार तपास सुरू आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत त्याच्याविरुद्ध ३० हून अधिक गुह्यांची नोंद आहे. त्यानुसार त्याच्याकडे एटीएस कसून चौकशी करत आहे.

पोलिसांच्या चौकशीत त्याचे नाव दलविरसिंग बालवतसिंग रावत उर्फ राजा उर्फ पप्पू नेपाळी असल्याचे उघडकीस आले. पप्पू नेपाळी याने आतापर्यंत ३० दरोडे टाकले आहेत. तो मोठमोठे दरोडे टाकायचा. आरोपी पप्पू हा नेपाळमधील माओवाद्यांच्या संपर्कात होता. दरोड्यात मिळालेली रक्कम तो माओवाद्यांना द्यायचा. त्या पैशाचा वापर घातपाती कारवाया करण्यासाठी केला जात होता.

(PRAHAAR)