X Close
X
9819022904

मुंबईत दिवसभरात १२२३ नवे रुग्ण; ५३ मृत्यू


Corona-9C90D001062020084303

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत गुरुवारी १२२३ नवे रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा १ लाख १३ हजारांवर गेला आहे. तर ५३ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ६२९७ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. मुंबईत सध्या २०,२११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईतील चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आली असून दिवसभरात १०,७३२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत ५ लाख १६ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी १२२३ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १०५८ रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत ८६,३८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत नानाचौक, मलबार हिल, बोरिवली, कांदिवली या भागांतील रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. दरम्यान, ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ३५ पुरुष आणि १८ महिलांचा समावेश होता. ३२ रुग्ण ६० वर्षांपुढील होते.

(PRAHAAR)