X Close
X
9819022904

मिलिंद देवरा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला, आंबेडकर व शिवरायांनाही अभिवादन


milind

मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मिलिंद देवरा यांनी आज सकाळी सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई शहरातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर देवरा यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले. तर शिवाजी पार्कात जाऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी देवरा यांच्यासमवेत दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड, भाई जगताप यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

संजय निरूपम यांना हटवून मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय सोमवारी राहुल गांधी यांनी घेतला. यानंतर देवरा यांनी यूपीएच्या अध्यक्षा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले होते. मुंबईत काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी झोकून देऊ व त्यासाठी पक्षातील नेते, पदाधिकारी मला पूर्ण सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. देवरा यांनी संजय निरूपम यांचेही पक्षाचे अध्यक्षपद सांभाळल्याबाबत आभार मानले आहेत.

(PRAHAAR)