X Close
X
9819022904

माजी केंद्रीय वित्त सचिवांची आर्थिक पॅकेजवर टीका


7

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर माजी केंद्रीय वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी टीका केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक परिणाम झाला आहे. त्यांचा आर्थिक पॅकेजमध्ये समावेश नसल्याची गर्ग यांनी ट्विट केले आहे.

सीतारामन यांनी १.७ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये गरिबांनी तीन महिन्यांचे धान्य व गॅस सिलिंडर आदींचा समावेश आहे. ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांच्यासाठी पॅकेज दिलासादायक आहे.

मात्र, ८ कोटी लोक असंघटित व्यवसायात आहेत, तर १० कोटी कामगार आहेत. त्या सर्वांना किमान १ लाक लाख कोटी रुपयांची गरज असल्याचे गर्ग यांनी ट्विट केले आहे.

(PRAHAAR)