X Close
X
9819022904

महिला हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पराभूत


Mumbai:

टोक्यो (वृत्तसंस्था) : भारताच्या महिला हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत अर्जेंटिनाकडून २-१ अशी मात खावी लागली. मात्र, तिसरा क्रमांक मिळवण्यासह पदक मिळवण्याची आशा कायम आहे. कांस्यपदकासाठी आता ग्रेट बिटनशी झुंजावे लागेल.

अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून एकमेव गोल ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला. भारताने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत सामन्यात १-० अशी दमदार आघाडी घेतली होती. पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार रानी रामपालच्या पासवर गुरजीत कौरने भारताला आघाडी मिळवून दिली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यातही भारताने अशीच सुरुवातीला आघाडी घेतली होती. पिछाडीवर पडल्यानंतर अर्जेंटिनाने भारतावर जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली होती. पण पहिल्या सत्रात भारताने त्यांची आक्रमणं थोपवून लावली होती आणि पहिल्या सत्रात भारताने १-० अशी आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र अर्जेंटिनाला गोल करण्यात यश मिळाले. १७व्या मिनिटाला त्यांनी गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती.

मध्यंतराच्या बरोबरीनंतर तिसऱ्या क्वार्टरची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनाने आणखी एक (३६ व्या मिनिटाला) गोल केला आणि सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी निर्णायक ठरली. फायनल प्रवेश करता आला नाही तरी भारताला कांस्यपदकाची संधी आहे. त्यासाठी आता ग्रेट बिटनशी झुंजावे लागेल.