नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाइन होते.
अधिका-यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीचे ४८ वर्षीय नेते मनीष सिसोदिया यांच्या शरीरातून ऑक्सिजनचा स्तर कमी झाला झाल्यामुळे आणि ताप असल्याने त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. सिसोदिया यांना अधिक तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरातील तापमान वाढत होते. तसेच, ऑक्सिजनचा स्तरही थोडा कमी झाला होता, असे आणखी एका अधिका-याने सांगितले.