X Close
X
9819022904

मनसे नगरसेवक दत्तात्रय कोतेंचे अपहरण


dattatray-kote

शिर्डी : मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांना अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केल्याचे वृत्त समोर आले आहे. सोमवारी मध्यरात्री बाभळेश्वर जवळच्या एका हॉटेलसमोर ही घटना घडली. कोते जेवणासाठी थांबले असता एका कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून कोते यांना गाडीत घालून अपहरण केल्याचे समजते आहे.

अपहरणावेळी दत्तात्रय कोते यांच्यासोबत शिर्डीच्या एका नगरसेविकेचे पतीही होते. लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मात्र याबाबत अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचं सांगितलं. घटनेची सत्यता पडताळून आहोत अशी माहिती त्यांनी दिली. सध्या शिर्डी नगरपंचायत अध्यक्ष पदासाठी निवडणूक लागलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोते यांचे अपहरण झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

(PRAHAAR)