X Close
X
9819022904

भायखळा परिसरातील लाकडाची वखार जळून खाक


AN

मुंबई : भायखळा परीसरातील लाकडाच्या वखारीला आग लागल्याची घडना घडली. संत सावंत मार्गावरील  लाकडाच्याल वखार असून मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग लागून वखार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, वखारीतील वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

 

मुस्तफा मार्केटमधील लाकडाच्या वखारीला मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि १२ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. लाकडाला आग असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशामुळे लागली अद्याप याची माहिती समोर मिळाली नाही.

आग लागण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. मुंबई शहरात गेल्या काही वर्षापासून अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

(PRAHAAR)