X Close
X
9819022904

भक्तांना गंडवणाऱ्या विकृत भोंदूबाबाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला


Whats-app-Prahaar
Mumbai:प्रहार वेब टीम कल्याण : टिटवाळ्यातील बहुचर्चित भोंदू बाबा मंजू माताजीच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश बाबाच्या चार सेवेकऱ्यांनी केल्यानंतर भोंदू बाबा आठवडाभरापासुन फरार झाला आहे. त्याने अटकेपासून बचाव करण्यासाठी कल्याण कोर्टात अंतरिम जामीन अर्ज सादर केला होता. सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश डी.एस.हातरोटे यांनी भोंदूबाबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला असल्याने भोंदू बाबाला कोणत्याही क्षणी अटक होणार आहे. कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा येथील वैष्णवी माता मंदिरातील मुख्य पुजारी लालदीप सिंग उर्फ मंजूमाता या भोंदूबाबाने श्रद्धाळू भक्ताच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला होता. भक्तांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी अनैसर्गिक करणाऱ्या या भोंदूबाबाच्या सेवेकरी भक्तानी बाबाच्या काळ्या कृत्याचा भांडाभोड केला. बाबावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करीत अनिसच्या मदतीने टिटवाळा पोलीस स्थानकात सेवेकऱ्यांनी धाव घेतली होती. पोलिसांनी शनिवारी ११ मे रोजी भोंदू बाबाच्या मंदिरावर छापा टाकीत कारवाईला सुरुवात केली. पितळ उघडे पडताच बाबाने मंदिरातून पळ काढला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी गेल्या आठवड्यात त्याने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला होता. सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांच्या न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला. याप्रकरणी शुक्रवारी २४ मे रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती अँड.तृप्ती पाटील यांनी दिली.