X Close
X
9819022904

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड


10

मुंबई : काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदावर आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत नसीम खान यांची विधानसभेचे उपनेतेपदी, मुख्य प्रतोदपदी बसवराज पाटील तर प्रतोदपदासाठी के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानपरिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे, उपनेतेपदी रामहरी रुपनवार आणि प्रतोदपदी भाई जगताप यांच्या निवडीला मान्यता दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दादर येथील टिळक भवनात काँग्रेसच्या विभागनिहाय बैठकांना गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिका-यांनी आपली मते मांडली. आज शुक्रवारी मुंबई, ठाणे या जिल्ह्यांची चर्चा होणार आहे.

 

(PRAHAAR)