पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात निदर्शने करुन गोंधळ घालण्यात आला.
कुलगुरू डॉ. नितीन करमलकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करणा-या,गोंधळ घालणा-या विद्यार्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढ-या रंगाचा पायजमा, उपरणे असा ड्रेसकोड ठेवण्यात आला होता. याला लोकतांत्रिक जनता दल, एनएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला.
सभामंडपामध्ये तणावाचे वातावरण आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेसकोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थी तर जुनाच काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचे चित्र दिसून आले.
(PRAHAAR)