X Close
X
9819022904

पंतप्रधानांच्या आवाहनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद


Mumbai:

जनतेने दाखवले देशभरात दिवे लावून एकतेचे दर्शन

नवी दिल्ली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला घरातील लाइट बंद करून घराच्या दरवाजात किंवा गॅलरीत दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील नागरिकांनी दिवे लावून एकतेचे दर्शन घडवले. गो कोरोना, भारत माता की जय आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आपआपला परिसर दुमदुमून गेला. सर्वांनी कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी प्रार्थनाही केली.

कोरोनामुळे झालेला अंधार छेदून आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या अंधारातून कोरोनाला हरवण्यासाठी प्रकाशाला चारी दिशेला सोडायचे आहे. रविवार, दि. ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर किंवा बाल्कनीत मेणबती, दिवा, मोबाईलच फ्लॅश लाईट लावावी. सर्वजण मिळून कोरोनाच्या अंधकाराला मिटवूया. घरातील सर्व लाईट बंद असल्याने या दिव्यांचा प्रकाश चौफेर पडेल आणि आपण सर्वजण सोबत असल्याची भावना निर्माण होईल. यावेळी असा संकल्प करा की आपण सोबत आहे. यावेळी कोणीही सोशल डिस्टन्सिंग तोडायचे नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी एका व्हीडिओ संदेशाद्वारे केले होते.