Delhi: Union Minister Nitin Gadkari takes charge of the Ministry of Road Transport and Highways pic.twitter.com/28D9GIWNpT
— ANI (@ANI) 4 June 2019
नितीन गडकरी यांच्याकडे यापूर्वीच्या मंत्रिमंडळातही भूपृष्ठ वाहतूक हे खाते देण्यात आले होते आणि त्यांनी त्या खात्यात उत्तम काम केले होते. या मंत्रिमंडळातही त्यांच्यावर याच खात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयात त्यांना ओरिसातून निवडून आलेले प्रताप चंद्र सारंगी राज्यमंत्री म्हणून लाभले आहेत.
Delhi: Union Minister & Shiv Sena MP, Arvind Sawant, takes charge of Ministry of Heavy Industries and Public Enterprises pic.twitter.com/mBjCeVT5EQ
— ANI (@ANI) 4 June 2019
अरविंद सावंत हे शिवसेनेच्या तिकिटावर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे अनंत गीते यांना अवजड उद्योग खाते देण्यात आले होते. या खात्यावरून शिवसेना नाराज झाली होती. या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याविरोधात पराभूत झाले. या मंत्रिमंडळातही अवजड उद्योग खात्याची धुरा शिवसेनेकडे देण्यात आली असून अरविंद सावंत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालण्यात आली आहे. शिवसेनेला आणखी एखाद्या मंत्रिपदाची अपेक्षा आहे. (PRAHAAR)