X Close
X
9819022904

धारावीत तबलिगींमुळेच कोरोना : नसीम खान


Mumbai:

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखण्यात येणा-या धारावी झोपडपट्टीतही कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव तबलिग जमातीमुळे झाला असे बोलले जात होते. याला काँग्रेस नेते नसीम खान यांनीही दुजोरा दिला आहे.

नसीम खान यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन करतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी धारावीत तबलिगी जमातीमुळे कोरोनाचा फैलाव झाला असे दुजोरा देणारे वक्तव्य केले. त्यामुळे इतरांनी खबरदारी घ्यावी असे त्यांनी या व्हीडिओत म्हटले आहे. जनतेला आवाहन करताना हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ सायनमधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.