प्रहार वेब टीम
मुंबई : समलिंगी असल्याची जाहीर कबुली देणाऱ्या द्युती चंद या भारतीय महिला धावपटूने आपल्या संबंधाचा पुनरुच्चार केला आहे. हे संबंध माहीत झाल्यामुळे माझी बहीण मला ब्लॅकमेल करीत होती. तिने माझ्याकडे २५ लाख रुपये मागितले होते, असा दावा द्युतीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
Sprinter Dutee Chand who has come out about her same-sex relationship, in Bhubaneswar: My own sister is black mailing me, she asked me for Rs 25 lakh. She had once beaten me, I’d reported to the police. Since she was blackmailing me, I was forced to come out about my relationship pic.twitter.com/ueioaOtDHJ
— ANI (@ANI) May 21, 2019
काही दिवसांपूर्वीच द्युतीने आपण समलिंगी असून आपल्या जोडीदारासोबत आनंदी असल्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. द्यूतीला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा दावा तिच्या बहिणीने केला होता.
मात्र या दाव्याच्या दुसऱ्याच दिवशी द्युतीने स्वतः यासंदर्भात खुलासा केला आहे. माझ्या बहिणीने हे संबंध समजल्यानंतर मला ब्लॅकमेल करुन २५ लाख रुपये मागितले. मला मारहाणही केली. त्याची तक्रार मी पोलिसांकडे केली आहे. बहीण ब्लॅकमेल करीत असल्यामुळेच मला माझ्या संबंधांची जाहीर कबुली द्यावी लागली, असे द्युतीने सांगितले.