X Close
X
9819022904

देशातील कोरोना रुग्णांची संख्या १५ लाखांवर


Corona-9C90D014062020103146

मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात थैमान घालणा-या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता तब्बल १५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ४८ हजार ५१२ नवे रुग्ण आढळले, तर ७६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ३१ हजार ६९९ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ९ हजार ४४७ आहे. तर, ९ लाख ८८ हजार ३० जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३४ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात २८ जुलैपर्यंत १ कोटी ७७ लाख ४३ हजार ७४० नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. या पैकी ४ लाख ८ हजार ८५५ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरकडून ही माहिती मिळाली आहे.

(PRAHAAR)