लंडन (वृत्तसंस्था) : टेनिसमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी विम्बल्डन स्पर्धा यंदा होणार नाही. कोरोनामुळे ही स्पर्धा अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे.
ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने (एईएलटीसी) ही माहिती दिली. आता ही स्पर्धा २८ जून ते ११ जुलै २०२१ या कालावधीत होईल. १९४५ नंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी दुस-या महायुद्धावेळी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
आम्हाला मोठी खंत आहे की, ऑल इंग्लंड क्लब आणि व्यवस्थापन समितीने कोरोना व्हायरसमुळे यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेशी संबंधित लोकांची जबाबदारी आम्ही जाणतो आणि त्यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत, असे एईएलटीसीने एका निवेदनात म्हटले.
(PRAHAAR)