दापोली : धो धो कोसळणा-या पावसाने सोमवारी उत्तर रत्नागिरीला अक्षरश: झोडपून काढले. दापोली तालुक्यात तर आभाळ फाटल्यागत कोसळलेल्या पावसाने दापोलीकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले. दापोली तालुक्यातील बहुतांशी सर्व नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने पुर परिस्थितील निर्माण झाली होती. अनेक गावातील पुलांवरून पाणी गेल्याने वाहतुक ठप्प होवून जनजीवन विस्कळीत झाले.
गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी रात्रीपासून दापोली परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला. शहरापेक्षा तालुक्याच्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. दापोली तालुक्यात गेल्या २४ तासात सरासरी ७७.१४ मि.मी तर आजपर्यत एकूण १४१८.६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या जोराने दापोली-खेड व दापोली-मंडणगड मार्गही काही काळासाठी बंद करण्यात आला होता. दापोली-मंडणगड मार्गावर पालगड पवारवाडी येथे पुलावर व रस्त्यावर पाणी आल्याने काहीकाळ वाहतुक बंद ठेवावी लागली तसेच शिवनारीकडे जाणा-या दापोली होमिओपथिक मेडिकल काॅलेज जवळच्या पुलावर पाणी आल्याने साखळोली, कोळबांद्रे, आपटी, बोरघर, शिवनारी या गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता तर दापोली तालुक्यातील आवाशी-टांगरकडे जाणा-या मुस्लिम मोहल्ला येथील पुलावरून पाणी जावू लागल्याने तेथील वाहतुक काळी काळसाठी बंद ठेवण्यात आली होती. तसेच वाकवली-पोयनारकडे जाणा-या पुलावरून सुमारे दोन-तीन फुट पाणी आल्याने गवळवाडी, मराठवाडी, पोयनार आदी गावांचा संपर्क तुटला होता तर बांधतिवरे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने ताडील, म्हैसोंडे, अडखळ, सुरा आदी गावांचा संपर्क तुटला होता. दादरपुलावरून पाणी वाढल्याने टांगर, वेळवी, माटवण, कादिवली, विरसई, भोमडी, डौली, शिरसोली, आवाशी आदी गावांचा संपर्क तुटला होता.
एस.टी.बस गाडया अडकल्या
दापोलीहून सकाळी सुटणारी ८.४५ दापोली-मिरज व ९.०० दापोली-अक्कलकोट गाडया मुंबई-गोवा महामार्ग बंद असल्याने व खेड मधील जगबुडी व चिपळूण येथील वाशिष्ठीला पुर आल्याने सदरच्या गाडया खेड स्थानकापर्यंत जावू शकल्या.
दापोलीतील एस.टी.बस गाडया रद्द
दापोलीत २४ तासामध्ये पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचा नदयांना पुर येवून पाणी रस्त्यावर आल्याने एस.टी.महामंडळाच्या अनेक गाडया रदद करण्यात आल्या त्यामध्ये सकाळी ७ वा. दापोली-मांदिवली,स.८.३० दापोली-आवाशी,स.८.३० दापोली-बिर्जेवाडी,स.९.१५ ची दापोली-पांगारी, (पन्हाळेकाझी पर्यत),स.१२.००ची दापोली-सडवे, (मार्गात बदल वाकवली मार्ग),दु.१२.०० दापोली-पांगारी, (पन्हाळेकाझी पर्यत),११.१५ दापोली-मुगीज, स. १०.३० दापोली माटवण बोरीवली, स.११.३० दापोली-ताडील, दु. १२.०० दापोली-म्हैसोंड, स.१०.४५ दापोली-वेळवी राममंदिर या गाडया दापोली आगाराकडून रदद करण्यात आल्या आहेत.
दापोलील धरणे ओसंडून वाहू लागली
दापोली तालुक्यातील प्रमुख धरण क्षेत्रामध्ये पाउस पडल्याने आवाशी, टांगर, पंचनदी, शिरसाडी, हर्णै-खेम ही धरणे ओसांडून वाहू लागली आहेत. यामध्ये आवाशी धरणाचा पाणीसाठा ११.१५१ टी.एम.सी, शिरसाडी धरणाचा पाणीसाठा ४.४०८ टि.एम.सी,पंचनदी धरणाचा पाणीसाठी १.७३८ टी.एम.सी असून आत्तापर्यत सर्वच धरणे ९५ टक्के तर काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.
दापोली गेल्या २४ तासामध्ये विक्रमी पाउस
दापोली तालुक्यात गेल्या २४ तासामध्ये विक्रमी पाउस पडला आहे. यामध्ये दापोली शहरामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यामधील इतर भागामध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीय होते. दापोली तालुक्यात पालगड, वेळवी व वाकवली मध्ये सर्वाधिक पावसांची नोंद झाली असून सर्वात कमी पाउस दाभोळ मध्ये पडला आहे.
दापोली तालुक्यातील आत्तापर्यत एकूण १४१८.६३ मि.मी.नोंद झाली आहे.
दापोली- ३१ मि.मी.
वाकवली- १२३ मि.मी.
पालगड- १४३ मि.मी.
आंजर्ले- ४३मि.मी.
दाभोळ- १३ मि.मी.
बुरोंडी- ३५ मि.मी.
वेळवी- १५२ मि.मी.
एकूण- ५४० मि.मी.
सरासरी- ७७.१४ मि.मी.
एकूण- १४१८.६३
The post दापोलीत सर्वत्र पावसाचा हाहाकारः जनजीवन विस्कळीत appeared first on .
(PRAHAAR)