दर्शनासाठी जाणा-या कुटुंबियांच्या ट्रॅक्सला ट्रकची धडक, दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Mumbai:प्रहार वेब टीम
कोल्हापूर : सांगली – कोल्हापूर मार्गावर नवविवाहित जोडप्याला ज्योतिबा दर्शनासाठी घेऊन जाणा-या ट्रॅक्सचा आणि सिमेंटच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले, 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कोल्हापूर येथील हातकणंगले गावाजवळ सकाळी 7 ला घडला.
कर्नाटकच्या बागलकोट येथील कुटुंब नवविवाहित जोडप्याला घेऊन ज्योतिबा दर्शनासाठी जात होते. यावेळी सीमेंटचा ट्रक आणि ट्रॅक्समध्ये कोल्हापूर येथील हातकणंगले गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रॅक्समधील एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. या अपघातात चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.