मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळल्याने या इमारती खाली ४० ते ५० लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केसरबाई या चार मजली इमारतीचा निम्मा भाग कोसळला. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या परिसरातील सर्वच इमारती या जुन्या असल्याने आजूबाजूच्या ४ इमारतीमधील रहिवाशांनाही खाली करण्याचे काम सुरु केले आहे.
The post डोंगरीत चार मजली इमारत कोसळली, ४० ते ५० जण दबल्याची भीती appeared first on .
(PRAHAAR)