X Close
X
9819022904

ठाण्यात सांडपाण्याच्या टाकीत गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू


tank-thane
ठाणे : ठाण्यात ढोकाळी नाका येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या टाकीत गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. टाकीत आठ कामगार अडकले होते. या घटनेत तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला असून पाच कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अमित पुहाल (वय २०), अमन बादल (वय २१), अजय बुंबक (वय २४) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. ढोकाळी नाका येथील प्राइड प्रेसिडन्सी लक्झेरिया येथील मैदानात सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातील टाकीच्या साफसफाईसाठी आठ कामगार टाकीत उतरले. मात्र, सर्व कामगार त्या टाकीत अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या मोहीमेनंतर सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ पैकी तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विजेंद्र हतवाल (वय २५), मनजित वैद्य (वय २५),जसबिर पुहाल (वय २४), अजय पुहाल (वय २१), रुमेर पुहाल (वय ३०) हे कामगार जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. Thane West: 8 people got stuck in a 130 cubic meter deep Sewage Treatment Plant at Pride Presidency Luxuria in Dhokali around 12:25 am today. 3 of them died in the incident, rest 5 were rescued. Bodies handed over to police. #Maharashtra pic.twitter.com/XqzFGKw3cb — ANI (@ANI) May 10, 2019   (PRAHAAR)