X Close
X
9819022904

टोक्यो ऑलिम्पिकमधून सेरेनाची माघार


serena may5

वॉशिंग्टन : अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही. सेरेनाने २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली असून तिने ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदके पटकावली आहेत. मी खरोखर ऑलिम्पिकच्या यादीत नाही. मला त्याबद्दल माहिती नाही. मी या यादीमध्ये नसले, तर मी तिथे जाऊ शकत नाही. अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे मी हा निर्णय घेतला. तिथे न जाणे कसे असेल याबद्दल मी विचार केला नाही. भूतकाळातील ऑलिम्पिक माझ्यासाठी खूप चांगले होते, असे सेरेना हिने सांगितले.

सेरेनाने २००० सिडनी आणि २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने एकेरीत व दुहेरी प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचे कारण सेरेनाने उघड केलेले नाही.

(PRAHAAR)