X Close
X
9819022904

झुंजार युवीचा क्रिकेटला अलविदा : यापुढे ‘युवी कॅन’


yuvrajsingh28022018033009

मुंबई : भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने आक्रमक चेहरा देणाऱ्या आणि गंभीर आजाराशी झुंज देत पुन्हा नव्याने उभारी घेणाऱ्या युवराज सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांने भावुक होत ही घोषणा केली. यापुढे ‘युवी कॅन’ या संस्थेच्या माध्यमातून कर्करुग्ण बालकांच्या उपचारांसाठी कार्यरत राहणार असल्याचे युवराज सिंगने सांगितले.

या पत्रकार परिषदेत युवराज सिंगने आपल्याला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे तसेच निवड समिती सदस्यांचे आभार मानले. कॅन्सरशी दिलेल्या लढ्याचा युवीने उल्लेख केला. खडतर काळात आईने खंबीर साथ दिली, त्याचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख त्याने केला. कॅन्सरशी लढून पुन्हा मैदानात आलो, ४०० हून अधिक सामने खेळल्याचा अभिमान वाटतो, २०११ चा विश्वचषक आणि २००७ च्या स्पर्धेतील ६ षटकार संस्मरणीय होते, असे त्याने सांगितले.

अलीकडच्या काळात यश मिळत नव्हते आणि संधीही मिळत नव्हती. भविष्याविषयी मनात गोंधळ होता. विश्वचषकात खेळताना निवृत्ती पत्करली असती तर अधिक आनंद झाला असता. यावर्षीची आयपीएल शेवटची आयपीएल असेल, असे वर्षभरापूर्वी ठरवले होते, असे युवी म्हणाला.

(PRAHAAR)