X Close
X
9819022904

कोरोनावर आयुर्वेदिक उपचाराला ‘आयएमए’चा विरोध


ayurveda 29-7-16

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद आणि योगाद्वारे कोरोनाची लक्षणे नसलेली किंवा अतिशय सौम्य लक्षणे असलेले रुग्णांच्या उपचारासाठी औपचारिक मंजुरी देण्याच्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) विरोध दर्शवला आहे. आयएमआयने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना याबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत.

देशातली डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असलेल्या भारतीय वैद्यकीय संघटनेने आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर अनेक प्रश्न डागले आहेत. केंद्र सरकारने कोणत्या आधारे आयुषच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलद्वारे कोरोनावर उपचार करण्यास मंजुरी दिली, असा प्रश्न आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयुष आणि योगाद्वारे उपचार करण्यासाठी, कोरोनाला रोखण्याबाबतचा प्रोटोकॉल जारी केला आहे, असे आयएमएने म्हटले आहे. या पद्धतीच्या समर्थनासाठी आरोग्यमंत्र्यांनी अनेक संस्थांची नावे देखील घेतली आहेत. हे लोकांच्या व्यक्तीगत अनुभवांवर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आयुर्वेदिक औषधे आधुनिक औषधांच्या आधारशिलेचा एक भाग आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हा निर्णय त्यांनी कोणत्या आधारे घेतला, अशी विचारणा आयएमएने केली आहे.

कोरोनाच्या रुग्णांवर आयुर्वेद किंवा योगाच्या द्वारे उपचार करण्याबाबतच्या अभ्यासाशी संबंधित समाधानकारक पुरावे आहेत का, असा प्रश्नही भारतीय वैद्यकीय संघटनेने विचारला आहे. या दाव्याचे समर्थन करणारे आणि आरोग्य मंत्रालय आयुष प्रोटोकॉलच्या डबल ब्लाइंड अभ्यासासाठी तयार आहेत का?, सरकारच्या किती मंत्र्यांनी स्वत: आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून उपचार घेतले आहेत?, जर हा उपचार प्रभावी असेल तर कोविड केअर आणि कंट्रोल आयुष मंत्रालयाकडे सोपवण्यासा आपल्याला कोणी अडवले आहे?, तसेच कोरोनाचे गंभीर रूप हायपर इम्यून स्टेटस आहे की इम्यून डेफिशियन्सी स्टेटस आहे? असे एक ना अनेक प्रश्न संघटनेने उपस्थित केले आहेत.

(PRAHAAR)