X Close
X
9819022904

कोरोनाचे २४ तासांत ३,३७,७०४ नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्ण १० हजारावर


Covid-F89F28092020081129

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल ३४ कोटी ३५ लाखांचा टप्पा पार केला आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन लाख ३७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे तीन लाख ३७ हजार ७०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४ लाख ८८ हजार ८८४ वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी २१ लाख १३ हजार ३६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

 

देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०,०५० वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. तर कोरोनाचा वेग वाढला असून देशातील पाच राज्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे ४८ हजार २७० रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर कर्नाटकात ४८ हजार ०४९ रुग्ण, केरळमध्ये ४१,६६८, तामिळनाडूमध्ये २९,८७०, गुजरातमध्ये २१,२२५ रुग्ण सापडले आहेत.

(PRAHAAR)