X Close
X
9819022904

कोरोनाची लस १० ऑगस्टपर्यंत उपलब्ध होणार; रशियाचा दावा


Corona-9C90D001062020084303

मास्को (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे. १० ऑगस्टपर्यंत कोरोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया कोरोना व्हायरसवरची लस बाजारात आणू शकते. रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी सीएनएनशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. मॉस्कोतल्या गामालेया इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार करण्यात आळी आहे. गामालेया इन्स्टिट्यूटचा वैज्ञानिकांचा दावा आहे की, सामान्य लोकांच्या वापरासाठी या लसीला १० ऑगस्टपर्यंत मंजुरी देऊ शकतो. पण सर्वात आधी लस फ्रंटलाईन आरोग्य कर्मचा-यांना दिली जाईल असेही रशियाच्या अधिका-यांनी म्हटले आहे.

(PRAHAAR)