X Close
X
9819022904

कोरोना कक्षात वीज पुरवठा बंद; व्हेंटिलेटर बंद झाल्याने रुग्णाचा मृत्यू


death-696x387

बीड (प्रतिनिधी) : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातंही कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. बीड येथील सरकारी रुग्णालयातील कोरोना कक्षात अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने एकच गोंधळ उडाला.


कोरोनाबाधित रुग्ण गेवराई तालुक्यातील असून त्या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बीड येथील सरकारी रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. काही सेकंदासाठी रुग्णालयातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. व्हेटिंलेटर बंद पडल्याने रुग्ण अत्यावस्थ झाला. रुग्णांची ही अवस्था बघून नातेवाईकांनीच धावपळ करत कक्षातील ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी व कोरोनाची लक्षण असणाºया रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची गरज भासते. असे असताना विजेची अद्यावत व्यवस्था करणे रुग्णालयाची जबाबदारी आहे. मात्र, तसे न घडल्याने पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

(PRAHAAR)